आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव स्फोट : नऊ जणांच्या निर्दाेष मुक्ततेला अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालेगाव येथे २००६ मध्ये झालेल्या स्फाेटप्रकरणी नऊ जणांची विशेष माेक्का न्यायालयाने २५ एप्रिल राेजी निर्दाेष मुक्तता केली हाेती. यापैकी एकाचा मृत्यू झाला हाेता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्वतंत्रपणे तपास करून हे सर्व संशयित निर्दाेष असल्याचे न्यायालयात सांगितले हाेते. दरम्यान, ‘एटीएस’ने मात्र या निर्णयाला उच्च न्यायालयात अाव्हान दिले अाहे. या स्फाेटात ३७ जण ठार झाले हाेते. नुरूल समसुदा, शब्बीर मसिह उल्ला (मृत), रईस अहमद मन्सुरी, डाॅक्टर सलमान अब्दुल डाॅक्टर फरोक मगदुमी, शेख मोहंमद अली शेख, आसिफ बशीर खान, झायेद अब्दुल अन्सारी आणि अब्रार अहमद गुलाम अशी संशयितांची नावे अाहेत.
बातम्या आणखी आहेत...