मुंबई- 2006 साली मुंबईत झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने 13 आरोपींपैकी 12 आरोपींना दोषी ठरवले आहे. एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश वाय.डी.शिंदे यांनी हा निर्णय दिला.
अब्दुल वाहिद असे त्याचे नाव आहे तर कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान अशी दोषींची नावे आहेत. तब्बल नऊ वर्षांनंतर न्यायालयाने प्रकरणी निकाल दिला आहे. याकडे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
दरम्यान, मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये 11 जुलै 2006 ला 11 मिनिटांत सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 188 निष्पाप लोकांचा मृत्यु झाला होता तर 830 जण जखमी झाले होते.
या ठिकाणी झाले होते साखळी बॉम्बस्फोट
खाररोड-सांताक्रुझ, वांद्रे-खाररोड, जोगेश्वरी-माहिम, मीरारोड-भार्इंदर, माटुंगा-माहिम व बोरीवली येथे हे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याप्रकरणी कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी,शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान या आरोपींना दहशत विरोधी पथकाने अटक केली होती.
विशेष न्यायाधीश वाय.डी.शिंदे यांच्यासमोर जवळपास साडेपाच हजार पानांचा पुरावा सादर करण्यात आला. आययपीएस व आयएएस अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, 11 जुलै 2006 ला काय झाले होते मुंबईत...