आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट मागणार्‍या पतीला कोर्टाचा दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लग्नाच्या वीस वर्षांनंतर पत्नीवर दोन लग्ने केल्याचा आरोप लावत घटस्फोटाची मागणी करणार्‍या पतीला मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. असे आरोप करणे ही मानसिक विकृती असल्याचे सांगत न्यायालयाने पतीकडून मिळणार्‍या पोटगीतही दोन हजार रुपयांनी वाढ करण्याचे आदेश बजावले.
पतीने 2010 मध्ये न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ‘1991 मध्ये जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा तिचा पहिला पती जिवंत होता. लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिच्या पहिल्या नवर्‍याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे आमचे लग्न वैध नव्हतेच,’ असा दावा पतीने घटस्फोटाच्या अर्जात केला होता. त्यावर पत्नीनेही न्यायालयासमोर आपली बाजू मांडली.
आपल्या पहिल्या पतीचे मानसिक संतुलन ढासळले होते आणि 1990 मध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचे तिने सांगितले. याबाबत पोलिसात नोंद असल्याचे तिने नमूद केले. त्यावर न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावत पोटगी पाच हजारांहून सात हजार करण्याचे आदेश दिले.