आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करसाठी ‘कोर्ट’ची निवड; ज्युरी रवैल यांचा राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यंदा ऑस्करसाठी भारताची एंट्री म्हणून चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची निवड झाल्याची घोषणा बुधवारी झाली. त्याच्या काही तासांतच चित्रपट निवड ज्युरी समितीचे सदस्य चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. तथापि, समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्याशी झालेल्या वादाचे यामागे कारण असल्याचे रवैल यांनी स्पष्ट केले. ट्विटमध्ये ते म्हणाले, मला ‘कोर्ट’चा पूर्णपणे अभिमान असून त्याला पूर्ण पाठिंबाही आहे. अमोल पालेकरांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे मी राजीनामा देत आहे.
दरम्यान, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस सुपर्ण सेन यांनी रवैल यांचे आरोप हास्यास्पद ठरवले. ‘कोर्ट’ची ऑस्करवारी.