आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन बिल्डरांच्या अटकेस न्यायालयाची तूर्त स्थगिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या अल्ताफ इमारतीच्या मूळ मालकाच्या तिन्ही मुलांना 16 जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने बुधवारी दिले. शरीफ, मोहंमद आणि इरफान फर्निचरवाला अशी या तिघांची नावे आहेत.

इमारत कोसळल्यानंतर सोमवारी या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या इमारतीत संदीप बाफना याने लीजवर दुकान घेतले आहे. या प्रकरणात बाफनावर मुख्य आरोप असल्याचे फर्निचरवाला यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फर्निचरवाला यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 15 जुलैपर्यंत पुढे ढकलली. तसेच त्यांना तोपर्यंत अटक न करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे फर्निचरवाला यांना दिलासा मिळाला आहे.