आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवा फोन करणार्‍या ट्रॅव्हल एजंटला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तर प्रदेशला जाणार्‍या रेल्वेत बॉम्ब असल्याचा फोन करणार्‍या ट्रॅव्हल एजंटला अटक केली आहे. रेल्वे उशिरा सुटावी यासाठी आरोपीने फसवा फोन केला होता.

रमेशचंद्र चौरसिया या ट्रॅव्हल एजंटला अटक करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता उत्तर प्रदेशकडे जाणार्‍या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती चौरसियाने सीएसटी रेल्वेस्थानकाला फोनवर दिली होती. मात्र, रेल्वेत बॉम्ब आढळला नाही. चौरसियाच्या फोनमुळे रेल्वेला तीन तास विलंब झाला होता. त्याने तत्काळअंतर्गत काढलेली दोन तिकिटे शेवटच्या क्षणापर्यंत विकली नाहीत. रेल्वेला तीन तास विलंब झाल्यास तिकिटांचे पैसे मिळतील, यासाठी फोन केल्याची कबुली त्याने दिली.