आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील ‘भीम अार्मी’ची साेशल मीडियावर क्रेझ, महाराष्‍ट्रातून सर्वाधिक पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐंशीच्या दशकात ‘दलित पँथर’ नावाची राज्यात जहाल संघटना होती. ‘पँथर’ची काॅपी म्हणावी अगदी तशीच ‘भीम आर्मी’ नावाची एक आक्रमक संघटना सध्या प्रसिद्धीस येत आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे दलितांवर झालेल्या अत्याचारासंदर्भात या संघटनेने देशभर रान उठवण्यास सुरुवात केली आहे. संघटनेचा अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर रावण याला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दलित युवकांची संख्या सर्वाधिक आहे.   
 
या संघटनेतर्फे रविवारी दिल्लीत जंतरमंतरला निदर्शने करण्यात अाली, त्यालाही देशभरातील दलित युवकांची मोठी हाेती. सहारनपूर जिल्ह्यातील शब्बीरपूर गावी ५ मे रोजी दंगल झाली. त्यात शंभर दलितांची घरे जाळण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ तेथील भीम आर्मी संघटनेने ९ मे रोजी महापंचायत बोलावली होती. त्या महापंचायतीवर हल्ला झाला हाेता. या घटनेच्या निषेधार्थ तेथील भीम आर्मी नावाची संघटना पुढे आली अाहे. दिल्लीत या संघटनेने मोठ्या आंदोलनाची तयारी चालवली आहे. संघटनेचा अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर रावण याच्या आवाहनाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. भीम आर्मीच्या फेसबुक पेजला मोठ्या संख्येने युवकांचे लाइक्स मिळत आहेत.   
 
गुजरातच्या उना दलित अत्याचार प्रकरणातून जिग्नेश मेवाणी हा दलित युवा नेता पुढे आला. तसाच सहारनपूर दंगल प्रकरणातून चंद्रशेखर पुढे येतो आहे. चंद्रशेखरला ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला अाहे. रिहाई मंच, भागीदार आंदोलन, राष्ट्रीय दलित अधिकार मंच, पिछडा महासमाज अशा अनेक संघटनाही चंद्रशेखरबरोबर उभ्या आहेत.  ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ ही रामप्रसाद बिस्मिल यांची गझल स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय क्रांतिकारकांचा मंत्र होती. तीच गझल भीम आर्मीचा चंद्रशेखर रावण म्हणतो. त्याच्या तलवार कट मिशा, अंगावरची निळी शाल अाणि दणकट शरीर यामुळेही चंद्रशेखर हा अाक्रमक नेत्याच्या  रूपात पुढे येतो आहे. त्यामुळेच त्याच्या व्हिडोओजला सोशल मीडियावर लाइक्स मिळत आहेत.
 
सरकारने ठरवले नक्षलवादी 
चंद्रशेखरहा सहारनपूरचा आहे. भीम आर्मीचे सध्या ४० हजार सदस्य आहेत. चंद्रशेखरला लगाम घालण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने त्याला नक्षलवादी ठरवले आहे. मात्र, ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने जे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत, त्याच मार्गाने आपण हा लढा पुढे नेणार आहोत,’ असे चंद्रशेखर सांगतो आहे. उना अत्याचारानंतर अहमदाबाद येथील मोर्चाला महाराष्ट्रातून हजारो युवक गेले होते. त्याचप्रमाणे दिल्लीतील आंदोलनासही महाराष्ट्रातून युवक सहभागी झाले हाेते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा,  मोर्चामध्ये सहभागी झालेल्या हजारो युवकांच्या सहभागाचे क्षणचित्रे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...