आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crazy Boys Performing Stunts Inder Running Railway In Mumbai

धोकादायक VIDEO: धावत्‍या रेल्‍वेखाली रुळांमध्‍ये झोपण्‍याचा विकृत स्‍टंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धावत्या रेल्वेत उद्दाम तरुणांची स्टंटबाजी नवी नाही. मुंबईत लोकल ट्रेनमध्‍ये असे प्रकार रोज दिसतात. धावत्‍या लोकलमधून वेडेवाकडे चाळे करण्‍याचा हौस या तरुणांना असतो. दोन महिन्‍यांपूर्वीच अशी स्‍टंटबाजी एकाच्‍या जीवावर बेतल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. परंतु, आता धावत्‍या ट्रेनखाली स्‍टंटबाजीचे प्रकार समोर आले आहेत. असे स्‍टंट करणारी मुले अतिशय लहान आहेत. स्टंट करण्यासाठी ही मुले रेल्वे रूळावर झोपताहेत. लोकल ट्रेन वरून जाईपर्यंत रूळावरच झोपून राहतात. रेल्‍वे रुळांच्‍या मधल्‍या जागेत मुले झोपतात.

या स्‍टंटबाजीचा व्हिडिओ आम्‍ही दाखवत आहोत. व्हिडिओ विचलित करु शकतो. मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्‍याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी ही मोबाईल क्लीप माध्‍यमांना दिली आहे. या मुलांच्‍या टोळक्‍यातूनच एकाने व्हिडिओ तयार केला आहे. त्‍यानंतर ही क्लिप पसरली. एका जागरुक नागरिकाला क्लिप मिळाल्‍यानंतर त्‍यांनी पोलिसांकडे ती पा‍ठविली. धोकादायक स्टंट करणारी ही मुले आणि स्‍थळ मुंबईच्या जवळपासचेच असण्‍याचा अंदाज आहे. अशा प्रकारेच स्‍टंट्स धोकादायक आहेत. जीव जाण्‍याचा धोका आहे. रेल्‍वे पोलिसांकडून वारंवार इशारा देण्‍यात येतो. अनेकदा कारवाईदेखील झाली आहे. परंतु, असे विकृत स्‍टंट्स थांबलेले नाहीत.