आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाळणाघरात 10 महिन्यांच्या मुलीस बेदम मारहाण, दाई अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवी मुंबईतील एका पाळणाघरात दाईने १० महिन्यांच्या मुलीस बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आलेे. पाळणाघराच्या व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाई मुलीला आपटून मारहाण करत होती. पोलिसांनी पाळणाघराची मालकीन आणि मुलीला मारहाण करणाऱ्या दाईस अटक केले आहे. २१ नोव्हेंबर रोजीच्या व्हिडिओमधून ही बाब समोर आली. पूर्वा पाळणाघरात दाई अफसाना नासिर शेख चिमुरडीला जमिनीवर आपटत मारहाण करत होती. डोक्याच्या आतमध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. पूर्वा पाळणाघराची मालकीन प्रियंका निकम व दाई अफसाना नासिर शेखला अटक केली आहे. प्रियंका निकमला गुरुवारी जामीन मिळाला. अफसानाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...