आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Never Retire Form Sachin Anjali Tendulkar

सचिनमधील क्रिकेट रिटायर होणे केवळ अशक्य- अंजली तेंडूलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आज अखेर सा-या क्रिकेटविश्वाला रडवून निवृत्त झाला. यावेळी तो स्वत:लाही रडण्यापासून रोखू शकला नाही. मैदानातून बाहेर पडताना सचिन भावूक झाला होता. त्याचवेळी मैदानात उपस्थित असलेली सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन यांनाही अश्रू रोखता आले नाहीत. सचिनने दिलेल्या भाषणावेळी अंजलीने आपल्या अश्रूना वाट मोकळी करून दिली. यानंतर अंजलीने आज वानखेडेवरील कॉमेंट्री बॉक्समधून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यावेळी अंजली म्हणाली की, क्रिकेटमधून सचिन निवृत झाला आहे, पण सचिनमधून क्रिकेट निवृत्त होणे केवळ अशक्य आहे. मी सचिनशिवाय क्रिकेटची कल्पना करू शकते, पण क्रिकेटशिवाय सचिन ही कल्पनाही करवत नाही’, अशी भावनिक प्रतिक्रिया अंजलीने दिली आहे.
आणखी पुढे वाचा.....