आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI To Honour Former India Captain Dilip Vengsarkar With Lifetime Achievement Award

दिलीप वेंगसरकर व भुवनेश्वर कुमारला बीसीसीआयचे पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)चे आठवे वार्षिक पुरस्कार आज (मंगळवारी) जाहीर झाले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 21 नोव्हेंबरला या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडणार आहे.
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दिलीप वेंगसरकर यांनी भारतातर्फे खेळताना सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. इंग्लंडमध्ये 1983 साली भारताने विश्वचषक जिंकला त्यावेळी वेंगसरकर भारतीय संघाचे सदस्य होते. 87 ते 89 या कालावधीदरम्यान वेंगसरकर यांनी 10 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. 1976 ते 1991 या दरम्यान 16 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केलेल्या वेंगसरकर यांच्या कामगिरीची दखल घेऊन बीसीसीआयने त्यांची निवड केली आहे.

भारताचा स्विंग व वेगवान गोलंदाजीत चमक दाखविणा-या भुवनेश्वर कुमारला देशांतर्गत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू (2013-14) म्हणून निवड करीत पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर झाला आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत भारतातर्फे 11 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भुवनेश्वर कुमार (पॉली उम्रीगर पुरस्कार), कर्नाटकच्या आर. विनय कुमार याला (लाला अमरनाथ पुरस्कार), महाराष्ट्राच्या केदार जाधवला (सर्वोत्तम फलंदाजीसाठी माधवराव शिंदे पुरस्कार), हिमाचल प्रदेशचा ऋषी धवनला (सर्वोत्कृष्ट गोलंदाजीसाठी माधवराव शिंदे पुरस्कार), अनिल चौधरी (देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्तम पंच), जम्मू-काश्मीरचा कर्णधार परवेझ रसूल (लाल अमरनाथ पुरस्कार) आदींना वेगवेगळे पुरस्कार जाहीर झाले आहेत.