आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी क्रिकेटपटू आणि सुनील गावसकर यांचे गुरू माधव मंत्री यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी कसोटीपट्टू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे माजी अध्यक्ष माधव कृष्णाजी मंत्री यांचे आज सकाळी हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. माधव मंत्री एक शिस्तप्रिय फलंदाज म्हणून त्यांच्या कालखंडात प्रसिद्ध होते.
क्रिकेट जगतातील आणखी एक अजरामर नाव सुनील गावसकर यांना मंत्री यांनीच घडविले. गावसकर आणि मंत्री कुटुंबियांत जवळचे नातेसंबंध आहेत. त्यामुळेच गावसकर यांना क्रिकेटचे धडे ते देऊ शकले. 1950 ते 60 दशकात त्यांनी भारतीय संघ व रणजी क्रिकेटमध्ये योगदान दिले. मंत्री यांना फलंदाजीपेक्षाही ते यष्टीरक्षक म्हणूनच संघात स्थान मिळाले होते. भारतीय संघाकडून ते चार कसोटी सामने खेळले होते. ते मूळचे नाशिकचे होते.
रणजीत मुंबईकडून एका सामन्यात त्यांनी द्विशतक ठोकले होते. रणजीत हा सामना सर्वात जास्त धावसंख्येचा ठरला होता. तो विक्रम आजही अबाधित आहे. 1988 ते 1992 या काळात मंत्री यांनी एमसीएचे अध्यक्षपद भूषविले.
मंत्री यांना मागील पंधरवड्यात ह्दयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक होत चालली होती. वयाची 90 पार केल्याने शरीर क्षीण होत चालले होते. अशातच त्यांना आज सकाळी दुसरा ह्दयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले.