आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cricketer Rohit Sharma And Ritika Sajdeh Is Now Engaged Officially

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धवल पाठोपाठ रोहितचा साखरपुडा, रितिकाने केले रो\'हिट मॅन\'ला क्लीन बोल्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने आपली मैत्रिण रितिका सजदेह हिच्याशी मंगळवारी साखरपुडा केला. मुंबईकर क्रिकेटपट्टू धवल कुलकर्णीपाठोपाठ रोहितला प्रेयसी रितिकाने अखेर क्लीन बोल्ड केले. आता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. हा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने, साधेपणाने व घरगुती स्वरूपात झाला. रोहित आणि रितिकाने ट्विटरवरुन आपल्या या सोहळ्याची माहिती दिली.
रोहित शर्मा आणि रितीका हे दोघे एकमेकांना गेल्या सहा वर्षांपासून ओळखतात. यंदाच्या आठव्या मोसमातील आयपीएल दरम्यान रोहितने रितिकाला प्रपोज करीत थेट अंगठीच घातली होती. यंदाच्या आयपीएल सामन्यादरम्यान प्रथमच रोहित व रितिकाचे प्रेम जगासमोर आले होते. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्याला रितिका जातीने हजर असायची. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने अखेर आपल्या संघाला यंदाचे विजेतेपद जिंकून दिले होते.
पुढे पाहा, रोहित-रितिकाच्या साखरपुड्याची छायाचित्रे...