आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्‍या लोकलमध्ये 70 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकलमध्ये एका 70 वर्षीय वृद्धेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या भायंदर स्थानकात हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी एका 22 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे. त्‍यामुळे पुन्‍हा लोकलमधून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अटक केलेल्‍या नराधमाचे नाव अमितकुमार झा, असे आहे. पीडित वृद्ध महिला शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास विरार-चर्चगेट लोकलमधून लगेजच्या डब्यातून एकटीच प्रवास करीत होती. त्यावेळी याच डब्यातून प्रवास करणा-या अमितकुमार झा याने त्यांचा विनयभंग केला. भायंदर स्थानक जवळ येत असल्याचे पाहून या नराधमाने त्यांच्यावर बलात्कार करण्‍याचाही प्रयत्‍न केला. स्‍टेशन आल्‍याचे पाहून पिडीत महिलेने आरडाओरडा केला. स्‍टेशनवर असलेल्‍या काही प्रवाशांनी त्‍वरित महिलेच्‍या डब्याकडे धाव घेतली व या नराधमाच्‍या तावडीतून महिलेची सुटका केली. नागरिकांनी त्‍याला चांगलाच चोप दिला व रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. वसई रेल्वे पोलिसांनी झा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व त्‍याला अटक केली.