आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गॅंगवॉर: गजा मारणे टोळीने गुंड पप्या गावडेचा केला खून, लवळे परिसरातील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे शहराच्या पश्चिम भागात पुन्हा एकदा गॅंगवारने डोके वर काढले आहे. कोथरूड परिसरात दहशतीचे प्रदर्शन करणा-या गुंड गजा मारणेच्या टोळीने आज गुंड पप्प्या गावडेचा गोळ्या घालून खून केल्याची माहिती पुढे येत आहे.
मारणे टोळीनेच पप्प्या गावडेचा खून केल्याचा आरोप गावडेच्या नातेवाईकांनी केला आहे. लवळे परिसरात आज ही घटना घडली आहे. हल्लेखोरांनी पप्प्या गावडेवर जवळून गोळ्या झाडल्या. यात पप्प्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यातील पश्चिम भागात पुन्हा एकदा गॅंगवार भडकण्याचा धोका आहे.