आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत वेश्याव्यवसायास नकार देणा-या तरूणीचा अमानुष शारीरिक छळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वेश्या व्यवसाय करण्यास नकार देणा-या 24 वर्षीय तरूणीने नकार दिल्याने याच व्यावसायात दलालीचे काम करणा-या तिघांनी तिचा अमानुष पद्धतीने शारीरिक छळ केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. तरूणीच्या सर्वांगावर चटके दिल्यानंतर महिलेने वेश्या व्यवसाय करण्यास नकारच दिल्याने तिचे ब्रेस्टच कापून टाकण्यात आले. या घटनेने भिवंडीत मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत कुंटणखाना चालवणा-या महिलेनेच पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित 24 वर्षीय तरूणी गुजरातमधील आहे. तिला नोकरीचे आमिष दाखवून मुंबईत आणले होते. त्यानंतर तिला भिवंडीतील रूबी नावाच्या कुंटणखान्याच्या मालकिनीला विकण्यात आले होते. मात्र, त्या तरूणीला आपण विकलो गेलो आहोत याची माहिती नव्हती. काही दिवसातच रूबीने तरूणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे रूबी संतापली व तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली.
अनेक वेळा तिला जबरी मारहाण करण्यात आली. मात्र तरूणीने या प्रकारास कायम विरोधच केल्याने तिच्या सर्वांगावर चटके देण्यात आली. तरीही ऐकत नसल्याने कुंटणखाना मालकिनीने दोन साथीदारांसह तिचे दोन्ही ब्रेस्टच कापून टाकले. तिच्या ओरडण्यामुळे इतरांचे तिकडे लक्ष केले व पुढील प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित तरूणीला भिवंडीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असली तरी धोकादायक स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संबंधित तरूणीला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात आले. भिवंडीत वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यूपी, गुजरात, बिहार व राजस्थानमधील मुली येथे आणल्या जातात व त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जातो.