आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मातोश्री’मध्ये कुकचा नाेकरावर चाकूहल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी स्वयंपाक्याने सहकाऱ्यावर चाकूहल्ला केला. या घटनेतील दोन्ही स्वयंपाकी नेपाळचे आहेत. पोलिसांनुसार, शनिवारी रात्री सेवक आणि पंडित हे दोन स्वयंपाकी हास्यविनोद करत होते. त्या वेळी पंडितने सेवकचा पाय ओढला. त्यामुळे संतप्त होऊन सेवकने स्वयंपाकघरातील चाकूने पंडितवर हल्ला केला. मध्यस्थीच्या प्रयत्नात मंदा ही मोलकरीण जखमी झाली. झटापटीत सेवक जखमी झाला. पोलिसांनी अटक केली. पंडित आणि सेवक ‘मातोश्री’त अनेक वर्षांपासून काम करत आहेत.