आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - हैदराबादची 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर इस्थर अनुह्या हिच्या हत्येचे गूढ उकलण्यात दोन महिन्यानंतर यश आल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. खबर्याने दिलेल्या माहितीवरून सीसीटीव्हीत इस्थरसोबत असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. चंद्रभान सानप असे संशयिताचे नाव असून त्याला नाशिकजवळून ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस सध्या सानपची चौकशी करत आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जानेवारीच्या सकाळी मुंबईच्या कुर्ला रेल्वे टर्मिनसवरील फलाट क्रमांक 5 वर इस्थरसोबतची एक व्यक्ती सीसीटीव्हीत दिसली होती. अंदाजे 40 वर्षाच्या आसपासची ती व्यक्ती इस्थरची बॅग घेऊन तिच्यासोबत चालत असल्याचे स्पष्ट झाले होते.
प्रीती राठी अँसिड हल्लाप्रकरणाचा तपास करत असलेल्या पथकानेच या आरोपीचासुध्दा शोध घेण्याचे काम हाती घेतले. अखेर त्यांना आरोपीचा शोध लागल्याचे सांगितले जात आहे. 4 जानेवारीपासून बेपत्ता असलेली सॉफ्टवेअर इंजिनिअर इस्थरचा मृतदेह 16 जानेवारी रोजी सायंकाळी ईस्टर्न एक्स्प्रेस वेजवळील मिठागारात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.