आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई नसलेल्या मुलाचे पालकत्व वडिलांकडे, उच्च न्यायालयाने दिला ताबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पत्नीच्या हत्येचा आरोपी व्यक्तीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अल्पवयीन मुलाचा ताबा दिला. आईच्या अनुपस्थितीत पित्यावरच मुलाची जबाबदारी व पालकत्व असल्याचा निकाल न्यायमूर्ती पी.व्ही. हरदास व ए.एस. गडकरी यांनी दिला.

पिता अमोल पवार यांनी सध्या सासर्‍याकडे असलेल्या आपल्या अडीच वर्षांच्या मुलाच्या ताब्यासाठी याचिका दाखल केली होती. पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पवार यांना अटक झाली होती. एप्रिल 2013 मध्ये सत्र न्यायालयाने त्यांची निदरेष मुक्तता केली. सुनावणीत न्यायालयाने सांगितले की, निदरेष मुक्ततेनंतर तेच मुलाचे नैसर्गिक पालक आहेत, ताब्यापासून त्यांना रोखता येणार नाही.