आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वाराने पोलिसाच्या अंगावर दुचाकी घातली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अल्पवयीन आरोपींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्या मृत्यूला चोवीस तास उलटण्याच्या आतच मुंबईत पुन्हा एकदा वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. देविदास निंबाळकर असे जखमी पोलिसाचे नाव आहे.

गुरुवारी दुपारी कुर्ला परिसरातील विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बैलबाजार चौकी येथे नाकाबंदी सुरू होती. या वेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराला निंबाळकर यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून इम्तियाज इलियास खान याने थेट निंबाळकर यांनाच धडक दिली. धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना इम्तियाजला लोकांनी पाठलाग करून पकडले. दरम्यान, निंबाळकर यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहतूकविभागाचे महासंचालक पांडे यांची बदली
राज्यवाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक एस. एन. पांडे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आर. के. पद्मनाभन यांची राज्याच्या वाहतूक विभागाच्या प्रमुखपदी अपर पोलिस महासंचालक पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ही बदली करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...