आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Register Against Builder, Kirit Somayya Demand

विक्रोळी दुर्घटनेप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्या यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विक्रोळी पार्क येथील सिद्धार्थनगर एसआरए इमारत दुर्घटनेला ही इमारत उभारणारा बिल्डर आणि त्रुटींकडे दुर्लक्ष करणारे एसआरए प्राधिकरणातील अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विक्रोळी पार्क साइट येथील सिद्धार्थनगर एसआरए इमारतीला 11 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. यात चार जणांचा मृत्यू झाला, तर 14 जण जखमी झाले होते. एसआरए इमारती कमकुवत झाल्या असल्याने त्यांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे. तसेच राज्य सरकारने मृत आणि जखमींच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. सदर प्रकरणी आपण मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी खोट्या, बेनामी आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावे बँक खाती उघडून स्वत:च्या कंपनीच्या नावे पैसे हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर सात दिवसांत एफआयआर दाखल करावी, त्यात कुचराई केल्यास आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.