आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: अनैतिक संबंधांतून चुलतीने केले पुतण्याच्या प्रायव्हेट पार्टवर वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नालासोपारा येथे एका 28 वर्षीय चुलतीने 24 वर्षीय पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. अनैतिक संबंधातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी चुलतीला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. जखमी पुतण्यावर मुंबईतील केईएम हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू आहेत.
असे आहे प्रकरण ?
ही चुलती आणि पुतणे मुळचे गाझीयाबादचे. अनेक दिवसांपासून त्‍यांचे अनैतिक संबंध होते. गाझीयाबादमध्ये राहत्या घरीच चुलती-पुतण्याचे अजब प्रेमप्रकरण सुरू होते. या प्रकरणाची कुणकुण घरच्यांना लागली. त्यामुळे पुतण्‍याला घरातून बाहेर काढण्‍यात आले. हा पुतण्‍या गाझीयाबादवरून थेट मुंबईजवळ नालासोपारा येथे आला. मात्र पुतण्याच्या प्रेमात बुडालेल्‍या चुलतीला काही चैन पडेना. काही दिवसांनी ती नालासोपाऱ्यात आली व पुतण्यासोबत राहू लागली. येथेही त्यांचे अनैतिक शारिरीक संबंध सुरूच होते.
गुप्‍तांगांवर ब्‍लेडने वार
चुलती आणि पुतण्‍यामध्‍ये काही कारणांमुळे वाद झाला. संतप्‍त चुलतीने थेट पुतण्‍याच्‍या गुप्‍तांगावर ब्‍लेडने वार केले. त्‍याच्‍या पाठीवर आणि पोटावरही तिने चाकूने वार केले. यामध्‍ये हा पुतण्‍या गंभीर जखमी झाला आहे. तर, चुतलीला पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- वांद्रेत प्लॅस्टिकला आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही
- पुणे मनपाला 'एए' मानांकन..