आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Arrested In The Case Of Acid Attack On Priti, Mumbai Police Investigated In 40 Days

प्रीतीवर द्वेषातून अ‍ॅसिड हल्ला करणारा जेरबंद,मुंबई पोलिसांनी चाळीस दिवसांत लावला छडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रीती राठी या दिल्लीतील उच्चशिक्षित तरुणीवर मुंबईत झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा उलगडा करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. प्रीतीच्या नात्यातीलच एका युवकाने द्वेषातून तिच्यावर या हल्ला केल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वांदे्र रेल्वे स्टेशनवर 2 मे रोजी ही घटना घडली होती. सकाळी दिल्लीहून गरीबरथ या एक्स्प्रेसने आलेले प्रिती (23), तिचे वडील अमरसिंग, मावशी सुनीता व काका विनोदकुमार हे वांद्रे टर्मिनलवर उतरले होते. प्रितीला कुलाबा येथील आनएनएसएच आश्विनी या आर्मी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली होती. तिला लेफ्टनंट नर्सिंग म्हणून ८ एप्रिल 2013 रोजी रुजू होण्याचे पत्रही मिळाले होते. प्रिती दिल्लीत राहत असलेल्या कॉलनीतील अंकूर नारायणलाल पनवार (23) हा तरुण प्रितीचा पाठलाग करीत त्याच रेल्वेतून मुंबईत आला होता. प्रिती कुटुंबीयांसह रेल्येतून उतरुन टर्मिनसबाहेर पडत होती. तितक्यात तोंडाला रुमाल बांधलेल्या अंकूरने चवनप्राशच्या जारमधून आणलेले अ‍ॅसिड प्रितीच्या तोंडवर फेकले होते. या हल्ल्यात प्रिती गंभीर जखमी झाली होती. तिची मावशी व एक प्रवासीही जखमी झाला होता. प्रवाशांच्या गर्दीत अंकूर नाहीसा झाला. मात्र त्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्या होत्या. तोंडावर रुमाल बांधल्याने तो स्पष्ट दिसत नव्हता.
रेल्वे पोलिसांनी जखमी प्रितीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र अ‍ॅसिडमुळे प्रितीचा डोळा, अन्ननलिकेला मोठी इजा झाल्याने प्रितीची झुंज महिन्याभरानंतर अयशस्वी ठरली. त्यानंतरही रेल्वे पोलिसांना आरोपीचा काहीच मागमूस लागत नव्हता. त्यामुळे प्रितीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार आठ महिन्यानंतर या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आला. त्यानंतर सतत 40 दिवस मुंबई पोलिसांनी दिल्लीत तळ ठोकून आरोपीचा माग काढला.एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या खास पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत अंकूरच्या मुसक्या आवळल्या. अत्यंत गुंतागुंतीच्या व कोणताही पुरावा नसलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मुंबई, दिल्ली, हरयाणा, गुजरात, उत्तराखंड या राज्यात पोलीस पथके पाठवण्यात आली होती.
रेल्वेचा वेढकाढूपणा
वांद्रे टर्मिनसमध्ये गुन्हा घडल्यानंतर आरोपी टर्मिनसमध्येच काही तास घालवतो. दिल्लीला जाणा-या गाडीने सुखरुप परततो. तोसुद्धा विना तिकीट. अंकुरचे दोन्ही हातावर अ‍ॅसिड पडल्याने भाजले होते. त्याच्या हाताला जखमा झाल्या होत्या. तरीदेखील त्याच्यावर कोणाचे लक्ष न गेल्याने तो विनासायास घरी पोचला. रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल केल्या असत्या तर अंकुर तेव्हाच साडपला असता, असे तपास पथकाचे मत आहे.
वडिलांचं हिणवणं नडलं?
अंकूर याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता, परंतु त्याला नोकरी मिळत नव्हती. प्रीतीला मिळालेल्या यशाचे उदारहण देत अंकूरचे वडील त्याला सातत्याने हिणवत होते. त्यामुळे अंकूरच्या मनात प्रीतीविषयी द्वेषभावना निर्माण झाली होती. त्यातून अंकूरने प्रीतीवर सूड उगवण्याचे ठरवले.
असा रचला कट
अंकुरने त्याच्या शेजारील कॉलनीतील गोडाऊनमधून सल्फुरीक अ‍ॅसिड मिळवले. प्रीती मुंबईला नोकरीसाठी जाणार असल्याच्या माहितीवरून अंकूरनेही तीच गाडी पकडली. प्रीती एकटी आढळताच तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा डाव अंकूरने रचला होता, परंतु प्रवासादरम्यान ती एकटी कोणत्याही स्थानकात उतरली नाही. त्यामुळे अंकूरने वांद्रे टर्मिनलवर डाव साधला.
आरोपी असा पळाला
प्रीतीवर अ‍ॅसिड फेकून अंकुर दुपारपर्यंत रेल्वेस्टेशनात थांबला. साडेतीन वाजता दिल्लीला जाणारी गाडी पकडली. घरच्यांना अंकूरने नोकरीच्या मुलाखतीसाठी भुवनेश्वर येथे जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अंकूरने गोवा, अहमदाबाद अशा ठिकाणी हॉटेलमध्ये नोकरी केली.
एनओसीमुळे गोत्यात
अहमदाबादमध्ये नोकरीसाठी पोलिसांची एनओसी आणण्यासाठी दिल्लीत आला होता. तेव्हा अंकूरला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गु्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने आरोपीला 24 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली. आरोपी विरोधात भक्कम पुरावे असून त्याला कठोर शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले.