आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाला व्यापा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विक्रीची खोटी बिजके (हवाला) सादर करणा-या 2 हजार 60 व्यापा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी घोषणा अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. विनोद तावडे, विक्रम काळे, रमेश शेंडगे यांनी थकीत विक्री कराबाबत तारांकीत प्रश्न विचारला होता.


खोटी बिजके देऊन (हवाला) राज्यातील 2 हजार 60 व्यापा-यांनी 1 हजार 600 कोटी रुपयांचा विक्री कर बुडवला असल्याचे मुळक यांनी मान्य केले. खोट्या बिजकांच्या आधारे वजावट घेणा-या या लाभार्थी व्यापा-यांना विक्रीकर वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. कर चुकणा-या व्यापा-यांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी सदस्य सभापतींच्या आसनासमोर आले. आणि त्यांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.