आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंग झालेल्या युवतीचा पोलिसात ‘पंगा’, केवळ बाराशे रुपये दंड आकारून सोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- युवतींनी दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या घटना आता मुंबईत नव्या नाहीत. मात्र एका मद्यधुंद युवतीने चक्क पाेलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घालण्याचे धाडस केले. दरम्यान, पोलिसांनी केवळ १२०० रुपये दंड आकारून तिला सोडून दिले. गुरुवारी रात्री एमअायडीसी पोलिस ठाण्यात झालेल्या या प्रकाराचा व्हीडिओ सोमवारी प्रकाशित झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
गुरुवारी रात्री ही युवती एका हॉटेलसमोर दारू पिऊन गोंधळ घालत होती. त्यामुळे हॉटेल चालकाने फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुनीता यादव (वय २५) या युवतीला ताब्यात घेतले. ती एका हॉटेलमध्येच रिसेप्शनिस्टचे काम करते. खूप नशेत असल्याने सदर हॉटेलवाल्याने तिला आपल्या हॉटेलमधून हाकलून दिले होते. त्यामुळे चिडून तिने हॉटेलसमोरच गोंधळ घालायला सुरुवात केली. सुनीताने हॉटेलसमोरच बाटलीही फोडली होती. दरम्यान, पोलिसांनी तिला ठाण्यात नेले, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र येथेही तिने सोबत आणलेली दारू ढोसत पोलिसांना शिवीगाळ केली. ती कधी आपण अनाथ असल्याचे, तर कधी मॉडेल, पत्रकार असल्याचे सांगत होती. शुक्रवारी सकाळी दारू उतरल्यावर सुनिताने खरी माहिती सांगितली. नंतर तिने पोलिसांची माफीही मागितली.