आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crises In Uttarakhand: 1250 Prilgrimes Of State Come Back Patangrao Kadam

उत्तराखंडमधील महाप्रलय: राज्यातील 1250 यात्रेकरू परतीच्या वाटेवर - पतंगराव कदम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्‍ट्रातून उत्तराखंड येथे गेलेले 2,960 पैकी 232 पर्यटक अद्यापही बेपत्ता असून 1250 लोक परतीच्या मार्गावर आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी दिली.


पुणे येथील अंबिका ट्रॅव्हल्सचे 33 व शिवगौरी ट्रॅव्हल्सचे 23 पर्यटक, नागपूरच्या प्रताप ट्रॅव्हल्सचे 5 पर्यटक अद्यापही बेपत्ता आहेत. औरंगाबाद येथील 113, नागपूरमधील 85, पुणे येथील 28, नाशिकमधील 2 व अमरावती येथील 4 अशा 232 व्यक्तींशी अद्याप संपर्क साधता आलेला नाही. तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून उत्तराखंड सरकारकडून त्यांची नावे अद्यापही जाहीर करण्यात आली नाहीत, असेही कदम यांनी नमूद केले.


राज्याचा विशेष फोर्स
आपत्ती नियंत्रणासाठी सरकारने विशेष फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 60 कोटी मंजूर केल्याची माहिती मदत कदम यांनी दिली. राज्यात आपत्ती आल्यास या फोर्सच्या माध्यमातून तातडीने मदत पोहोचवली जाईल. या फोर्सला विशेष वाहने देण्यात येणार आहेत. मंत्रालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतींत सुमारे पाच हजार चौरसफूट जागेमध्ये अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून या कक्षातून अतिशय उच्च दर्जाच्या व आंतरराष्‍ट्रीय स्तराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे कदम म्हणाले.