आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाणदिनी अलोट गर्दी, महामानवाला अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरासह देशभरातून आलेल्या लाखो अनुयायांनी दादरच्या चैत्यभूमीवर मंगळवारी अभिवादन केले.
गेल्या वर्षी महापरिनिर्वाणदिनी सुरू झालेले ‘एक वही, एक पेन’ अभियान यंदाही राबवण्यात आले. यंदा सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हे अभियान राबवण्याचा निर्णय फेसबुक आंबेडकराइट मूव्हमेंट (फॅम) या संघटनेने घेतला होता.
चैत्यभूमी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. समुद्राच्या जवळच असल्याने चैत्यभूमीच्या परिसरात सागरी पेट्रोलिंग करण्यात येत होते. या ठिकाणी दोन हजार पोलिस कर्मचारी आणि तीन हजार समता सैनिक तैनात करण्यात आले होते.
नोटाबंदीचा परिणाम
नोटबंदीचा परिणाम चैत्यभूमीवरही दिसून आला. दरवर्षी आठ दिवसांपासूनच विविध आंबेडकरी स्टॉल्सनी फुलणाऱ्या या परिसरात यंदा मात्र तुरळक स्टॉल्स दिसून येत आहेत. तसेच दुरून येणाऱ्या अनुयायांनाही नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळणारा भीमसागर आपापल्या घरी परतताना मोठ्या प्रमाणावर पुस्तक खरेदी करतो, हा आजवरचा अनुभव असताना यावर्षी मात्र पुस्तक विक्रीला नाेटबंदीचा चांगलाच फटका बसला अाहे. नाेटबंदीमुळे पुस्तकांची विक्री जवळपास ५० टक्क्यांनी घटली. विकल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये बाबासाहेबांच्या “प्रॉब्लेम आॅफ रूपी’ या पुस्तकाची सर्वा‌िधक मागणी होती.
बातम्या आणखी आहेत...