आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crowd At Yakubs Funeral Likely Due To Gangsters Prodding Maharashtra Cm Devendra

मुख्‍यमंत्री म्‍हणाले, गँगस्‍टर्सच्‍या इशाऱ्यावरच याकूबच्‍या जनाजाला गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो


मुंबई - याकूब मेमनच्‍या जनाजाला हजारोच्‍या संख्‍येने गर्दी जमली होती. या मागे गँगस्‍टर्सचा हात असल्‍याचे शंका मुख्‍यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्‍यक्‍त केली. गँगस्‍टर्सच्‍या इशाऱ्यानुसारच एवढी गर्दी जमली असावी, असे ते म्‍हणाले. याकूबला फाशी दिल्‍यानंतर गृहविभागाने त्‍याचा मृतदेह त्‍याच्‍या कुटुंबाकडे सोपवला होता. त्‍याच्‍या अंत्‍यसंस्‍कारासाठी हजारोच्‍या संख्‍येने लोक आले होते.
नेमके काय म्‍हणाले मुख्‍यमंत्री ?
मुख्‍यमंत्री म्‍हणाले, ''याकूबचा मृतदेह मुंबई विमानतळावर पोहोचला त्‍यावेळी त्‍याच्‍या घराबाहेर गर्दी नव्‍हती. पण, काही गँगस्‍टर्सच्‍या सांगण्‍यावरून ही गर्दी जमली असावी'', अशी शंका त्‍यांनी उपस्थित केली. त्‍यानंतर या ठिकाणी सुरक्षेसाठी तब्‍बल 35 हजार जवान तैनात करण्‍यात आले होते.

टाइगर मेमनचा फोन आलाच नाही
टाइगर मेमन याने त्‍याची आई हानिफा हिला फोन कॉल केल्‍याच्‍या बातम्‍या मीडियाने दिल्‍या. पण, टाइगरने त्‍याच्‍या कुटुंबियांपैकी कुणालाही फोन केला नसल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले. शिवाय राज्‍यातील सुरक्षा व्‍यवस्‍था आणखी मजबूत करण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. याकूबच्‍या फाशीचा बदला घेऊ, असे टाइगर याने त्‍याच्‍या आई आणि भावाला फोनवरून सांगितल्‍या बातम्‍या काही वृत्‍तवाहिन्‍यांनी प्रसारित केल्‍या होत्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा याकूबच्‍या जनाजाचे फोटोज....