आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाला उलटे टांगून मारत होते लोक, पोलिस उभे राहून पाहत होते तमाशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या समोर उलटे टांगून मारहाण करताना लोक... - Divya Marathi
पोलिसांच्या समोर उलटे टांगून मारहाण करताना लोक...
मुंबई- मुंबईतील डोंबिवली भागात काही लोकांनी एका व्यक्तीला खूप वाईट पद्धतीने मारहाण केली. दोन स्थानिक लोकांवर मारहाण केल्याचा आरोप आहे. भडकलेल्या लोकांनी त्या व्यक्तीला झाडाला उलटे टांगून खूप मारले तर पोलिस तेथे उभे राहून चुपचाप तमाशा पाहत राहिली. संबंधित व्यक्ती बेशुद्ध झाल्यावर पोलिस त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहचले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी तीन लोकांना अटक केली आहे. आता या घटनेचा व्हिडिए समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण...
 
- मन हेलावून टाकणारी ही घटना डोंबिवलीतील खोनी गावाजवळ घडली. मारहाण झालेला व्यक्ती गावाजवळ आलेल्या ट्रकमधून उतरला होता. पत्ता विचारल्यानंतर काही लोकांसोबत त्याचा वाद झाला. यानंतर दोन लोकांवर त्याने हल्ला केला.
- यामुळे स्थानिक लोक भडकले. त्यांनी त्या व्यक्तीला पकडले आणि झाडाला बांधून मारहाण केली. यानंतर सुमारे 20 ते 25 लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.
- त्याला इतके मारले की तो बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे पोहचली आणि ती ही मूकदर्शक बनली. अनेकदा विनंती करूनही त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे आला नाही.
- या व्यक्तीला झाडाला बांधलेले सोडून दवाखान्यात न्यायला दीड तास लागला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
आधीपासून आजारी होता तो व्यक्ती- 
 
- संबंधित व्यक्ती उत्तरप्रदेशमधील आजमगडचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याचे नाव अद्याप समोर आले नाही. त्याच्याजवळ एक कार्ड मिळाले आहे. त्यावर चंद्रेश असे लिहले आहे.
- त्याच्याजवळ काही कागदपत्रे मिळाली आहेत त्यावरून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे समोर येत आहे.
- या प्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करत 3 लोकांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरु आहे. आरोपी खोनी गाव व परिसरातील युवक आहेत.
 
पोलिसांनी दिले स्पष्टीकरण-
 
- एका पोलिस अधिका-याने सांगितले की, मार दिलेला व्यक्ती मानसिक रूग्ण होता. त्याला पोलिसांनी मारणा-या लोकांच्या गर्दीतून बाहेर काढले तेव्हा त्याने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांची वाकी-टॉकीही तोडली. ज्यानंतर त्याला पुन्हा झाडाला बांधण्यात आले.
- ज्यानंतर संतप्त लोकांनी त्याला पुन्हा मारहाण केली. त्यावेळी पोलिस तेथेच थांबून तमाशा पाहत होती. या प्रकरणी एस बी कचवे आणि एच एम गरुड या पोलिस कर्मचा-यांना निलंबित केले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज ...
बातम्या आणखी आहेत...