मुंबई- छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या (सीएसटी) सेंट्रल बिल्डिंगला लागलेली आग आटोक्यात आली आहे. अॅनेक्स बिल्डिंगच्या चौथ्या व पाचव्या मजल्याला शुक्रवारी सायंकाळी आग लागली होती. अग्निशामक दलाच्या आठ गाड्यांच्या मदतीने जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, सीएसटी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या अॅनेक्स बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. नंतर ती पाचव्या मजल्यावर पोहोचली. आग कशी लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेचा परिणाम हार्बर मार्गावरील वाहतुकीवर झाला होता. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. मध्ये रेल्वेची वाह्तूक सुरळीत सुरु असल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले.
सीएसटी स्टेशनच्या बिल्डिंगला लागलेल्या आगीची भीषणता पाहा; पुढील स्लाइड्सवर...
(फोटो- सीएसटी रेल्वे स्टेशनची इमारत, धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहे. )