आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : कफ परेडभागातील इमारतीच्या 21 व्या मजल्याला आग, 2 जणांचा मृत्यू; बजाज सुखरुप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग लागलेल्या मजल्यावरील घरांचा कोळसा झाला. - Divya Marathi
आग लागलेल्या मजल्यावरील घरांचा कोळसा झाला.
मुंबई - कफ परेड भागातील मेकर टॉवरला आज (मंगळवार) सकाळी 6.30 वाजता आग लागली, यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातआले आहे.
मकेर टॉवरच्या फ्लॅट क्रमांक 201 ते 211 मधील एकून 11 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. निवासी टॉवरच्या 20 व्या मजल्यावर आग लागली होती. बजाज इलेक्ट्रॉनिक्सचे एमडी शेखर बजाज यांचा येथे फ्लॅट आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. फायर ब्रिगेडच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फायर ब्रिगेडचे अधिकारी पी. रहांगडाळे म्हणाले, आगीचे कारण आताच सांगता येणे शक्य नाही. आमचा पहिला प्रयत्न हा लोकांना सुरक्षित बाहेर काढणे आहे. 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
- फायर ब्रिगेडची टीम पोहोचली तोपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला होता.
- मीडिया रिपोर्टनुसार, आग सर्व्हंट रुमला लागली होती. दोन्ही मृत व्यक्ती एका फ्लॅटमध्ये नोकर होते.
- 21 मजल्यांच्या या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला लागलेल्या आगीचे लोळ बऱ्याच दुरून दिसत होते.
- या बिल्डिंगमध्ये अनेक ऑफिसेस देखिल असल्याची माहिती आहे. ऑफिसेस उघडलेली नव्हती, त्यामुळे बिल्डिंगमध्ये कमी लोक होते. सकाळच्या वेळी आग लागल्याने मोठी हानी टळली आहे.
- शेखर बजाज हे बजाज इलेक्ट्रॉनिक्सचे एमडी आहेत. कफ परेड भागात अनेक उद्योजक राहातात.
अग्निशमन विभागाची तत्परतेने कारवाई
- अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. तीन अँब्युलन्स आणि चार वॉटर टँकरही घटनास्थळी दाखल झाले होते. इमारतीच्या 20व्या मजल्यावर आग लागल्याने हायड्रॉलिक शिडीचा वापर करुन आग विझवण्यात आली.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण आहेत शेखर बजाज
बातम्या आणखी आहेत...