आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनिष पाटील यांना 1.6 लाख रुपयांची भरपाई द्या, ग्राहक मंचाचा जेट एअरवेजला आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विमानाचे बुकिंग झालेले तिकीट देणे जेट एअरवेजला चांगलेच महागात पडले आहे. ठाणे येथे राहणारे मनिष पाटील यांना झालेल्या गैरसोयीमुळे भरपाई म्हणून 1.6 लाख रुपये देण्याचे आदेश ठाणे ग्राहक मंचाने जेट एअरवेजला दिले आहेत.

भोईसरचे रहिवासी मनिष पाटील यांनी 4 मार्च 2012 ला जम्मूसाठी जेट एअरवेजचे तीन तिकीटे खरेदी केले. पाटील दाम्पत्य वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणार होते. परंतु, विमानाच्या वेळेत पाटील दाम्पत्य विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना सिस्टिम फेल्युअरचे कारण पुढे करत बोर्डिंग पास देण्यास नकार देण्यात आला. विमान ओव्हरबुक झाल्याने विमानात चढता येणार नसल्याचे पाटील यांना जेट कंपनीकडून सांगण्यात आले.  

दिल्लीला जाण्यासाठी एअरवेजने पर्यायी विमान सुचवले. परंतु, पुढील प्रवासासाठी जम्मूला जाण्यासाठी कन्फर्मेशन देण्यात आले नाही. परिणामी, त्यांना आपली ट्रीप रद्द करावी लागली, असे मनिष पटील यांनी तक्रारीत म्हटले होते.

जेट एअरवेजच्या गलथान कारभारामुळे ट्रीप रद्द झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्या मोठे आर्थिक नुकसानही झाल्याचे पाटील यांनी ग्राहक मंचाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. पाटील यांनी सादर केलेली प्रवास, हॉटेल्स, आणि तेथील इतर खर्चाच्या बिलांवरुन ग्राहक मंचाने सव्वालाख रुपयांची नुकसान देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेला लागलेले 35000 रुपये, असे एकूण 1.6 लाख रुपये पाटील यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश ग्राहक मंचाने जेट एअरवेजला दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...