आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सायबर ग्राम योजना राबवणार, याेजनेसाठी 2.17 काेटींचा खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षणाबरोबरच संगणक साक्षर बनवण्यासाठी सायबर ग्राम योजना राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याकबहुल गट व शहरांसाठी सुधारित बहुक्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्यातील नऊ जिल्ह्यांत ही योजना राबवली जाईल. 

या योजनेसाठी  पहिल्या टप्प्यात  २ काेटी १७ लाख ७० हजार  रुपये खर्च  मंजूर करण्यात अाला अाहे . प्रत्येक जिल्ह्यात दोन हजार याप्रमाणे एकूण २८ हजार विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. सायबर ग्राम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुणे येथील अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयावर सोपवण्यात आली आहे. संगणक शिक्षण दिल्लीच्या सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लि. या कंपनीकडून देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षण व गटशिक्षण अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. सरकारी तसेच खासगी महाविद्यालयांतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक तुकाराम सुपे यांनी सांगितले.

आवश्यक विद्यार्थी संख्या उपलब्ध न झाल्यास आठ ते दहा शाळांचा गट तयार करून मध्यवर्ती ठिकाणी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या परीक्षांचा हंगाम लक्षात घेता नवीन शैक्षणिक वर्षापासून ही योजना राबवण्यात येण्याची शक्यता सुपे यांनी वर्तवली. संगणकाचे प्राथमिक ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी रोज एक तास याप्रमाणे ४० दिवसांचा अभ्यासक्रम सातवी ते दहावी इयत्तेतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल.   

बीड, जालन्यात लाभ  
बुलडाणा : चिखली, शेगाव, खामगाव, बुलडाणा गट
वाशीम : मंगळूरपीर, कारंजा गट
हिंगोली : हिंगोली गट
यवतमाळ : नेर गट
जालना : जालना  शहर
लातूर : लातूर व उदगीर शहर
बीड : परळी
जळगाव : चोपडा.
बातम्या आणखी आहेत...