आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे कोटी खर्चून मुंबईत सायकल ट्रॅक; मनपाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत आता सायकल चालवणे एक आनंददायी अनुभव देणारे ठरणार आहे. उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम दिशेला जोडणारे सायकल ट्रॅक बनवण्याच्या मुंबई महापालिकेच्या हरितवारी जलतीरी या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मंजुरी दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या पाईपलाईनभोवतीचे अतिक्रमण हटवून तेथे हा अनोखा सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. दिवाळीपर्यंत भांडुप पाइपलाइनभोवती सायकल ट्रॅकचा पहिला टप्पा सुरू होईल, अशी माहिती मनपा आयुक्त अजोय मेहता यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. 

अजोय मेहता  म्हणाले, मुंबईत रेल्वे, मेट्रो, रस्ते मार्गावरून वाहतूक केली जाते. त्यात आता या सायकल ट्रॅकमुळे चौथ्या वाहतूक मार्गाची भर पडणार आहे. मुंबईतील पाइपलाइनच्या भोवती अतिक्रमणे आहेत. पाइपलाइनला याचा धोका उद्भवतो म्हणून पाइपलाइनच्या दोन्ही बाजू विकसित करण्याची योजना मुंबई मनपाने आखली होती. त्यानुसार सायकल ट्रॅकची योजना तयार करण्यात आली. सायकल चालवणाऱ्यांसाठी विविध सोयी या मार्गावर देण्यात येणार आहेत. ज्यात सायकल स्टँड, पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधाही असेल.   पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत संपूर्ण योजना पूर्ण होईल, असेही अजोय मेहता यांनी सांगितले.

सायकल ट्रॅकची वैशिष्ट्ये 
४० ते ५० किमीच्या या मार्गावर ४० एंट्री एक्झिट पॉइंट असणार असून १९ रेल्वे स्टेशन, सात मेट्रो स्टेशन्स आणि ४ मोनोरेलची स्टेशन्स या मार्गाशी जोडली जाणार आहेत. दोन्ही दिशेने १० मीटर रुंदीच्या या सायकल ट्रॅकच्या मार्गावर बॉलीवूड थीम पार्क, बायोडायव्हरसिटी कॉरिडॉर आणि पुस्तकांची दुकानेही असणार आहेत. पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण दिशेला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...