आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अब्जाधीशाच्या पार्टीत असतात विदेशी अॅक्ट्रेस; त्यांच्या सूनेलाही आहे पेज 3 पार्टीची आवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
750 कोटींच्या बंगल्यामध्ये राहणारे सायरस पूनावाला हे जगातील सगळ्या मोठ्या स्टड फर्मचे मालक आहेत. - Divya Marathi
750 कोटींच्या बंगल्यामध्ये राहणारे सायरस पूनावाला हे जगातील सगळ्या मोठ्या स्टड फर्मचे मालक आहेत.
मुंबई/पुणे- उद्योगपती सायरस पूनावाला यांनी महात्मा गांधी यांचे एक दुर्मिळ चित्र आणि हस्तलिखित पत्र खरेदी केल्याने चर्चेत आले आहेत. महात्मा गांधी यांचे पेन्सिलने बनलेले चित्र त्यांनी 27 लाखांना विकत घेतले आहे. भारतातील 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये पुनावाला यांचा समावेश होतो. ते स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस बनविणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटयूटचे अध्यक्ष आहेत. 
 
अंबानी, बिग बी आणि सलमानच्या पार्टीत असते पूनावाला यांची सून
- सायरस पूनावाला यांचे कुटूंब पेज 3 पार्टीसाठी ओळखले जाते. पूनावाला यांच्या पार्टीत अनेकदा अमेरिकन अभिनेत्री हिलरी स्वांक आणि शॅरोन स्टोन हे देखील दिसले आहेत.
- त्यांची सून नताशा ही अनेकदा बिग बी, अंबानी आणि सलमान खान यांच्या पार्टीतही दिसली आहे.
- सायरस पूनावाला यांचा मुलगा अदार याची नताशा ही पत्नी आहे. त्यांचे लग्न 2006 मध्ये पुण्यात झाले. अदार आणि नताशा यांची भेट लंडनमध्ये झाली होती.
 
750 कोटींच्या बंगल्यात राहतात पूनावाला
- 'फोर्ब्स इंडिया'ने जारी केलेल्या 100 श्रीमंतांच्या यादीत गेल्या वर्षी पूनावाला हे दहाव्या स्थानावर होते. 750 कोटी रुपयांच्या बंगल्यात राहणारे पूनावाला हे जगातील सगळ्या मोठ्या स्टड फर्मचे मालक आहेत.
- पूनावाला यांच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी 750 कोटी रुपयात दक्षिण मुंबईत ब्रीच कॅन्डी येथील लिंकन हाऊस पूनावाला यांनी विकत घेतले आहे. 
- मुंबईतील प्रॉपर्टीचा हा सगळ्यात मोठा सौदा होता. लिंकन हाऊस हे दोन एकरावर असून हा बंगला ग्रेड-3 लेव्हलचा आहे.
- पूनावाला यांच्याकडे 83 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यांनी 50 वर्षांपूर्वी सीरम इन्स्टिटयूटची सुरुवात केली. यावर्षी सीरमला 360 मिलियन डॉलरचा फायदा झाल्याचे सांगण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...