आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dabbawallas Have Started Rolling On Two Wheels, Another Step Towards Modernisation

मुंबईतील डबेवाल्यांचा सायकाल- हातगाडीला बायबाय, दिमतीला आता खास मोपेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोपेडवरून खास पोज देताना मुंबईतील डवेबाले... - Divya Marathi
मोपेडवरून खास पोज देताना मुंबईतील डवेबाले...
मुंबई- मुंबईतील चाकरमान्यांना वेळेत डबे पोहचवण्याचे वर्षोनवर्षे काम करणारे मराठी डबेवाले आता वेगवान झाले आहेत. ठरलेल्या वेळेत व खात्रीशीर डबे पोहचविण्यासाठी डबेवाले आतापर्यंत हातगाडी व सायकलचा वापर करीत होते. आता मात्र ते टीव्हीएसने तयार केलेल्या खास मोपेडवरून डबे पोहचवण्याचे काम करणार आहेत.
नवी मुंबईतील भैरवनाथ पतपेढीने या मराठी बांधवांना कर्ज उफलब्ध करून दिले आहे. यामुळे मुंबईतील 60 डबेवाल्यांनी 60 मोपेड खरेदी केल्या आहेत. हे डबेवाले एका मोपेडवरून एकाचवेळी 50 हून अधिक डबे नेऊ शकणार आहेत. यासोबतच चार पैसे पदरात पडावे म्हणून डबेवाले जोडधंदा करणार आहेत. ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या वस्तू घरोघरी पोहोचवण्याचे कामही डबेवाले करणार आहेत.
मुंबईत लाखोंच्या संख्येने चाकरमनी आहेत. हे लोक कामानिमित्त, नोकरीनिमित्त सकाळीच लवकर बाहेर पडतात. त्यामुळे ते रोज बाहेर, हॉटेलात खावू शकत नाहीत. कामाच्या व्यापातून तेवढा वेळही मिळत नाही. अशा वेळी बहुतांश नोकरदार मराठी डबेवाल्यांकडून जेवण घेणे पसंत करतात. महाराष्ट्रीयन पदार्थ व मराठी चव यामुळे मुंबईत डबेवाल्यांना मोठी मागणी असते. गेली कित्येक वर्षे हे मराठी डबेवाले मुंबईत येणा-यांना जेवण पुरवत आहेत.
पूर्वी डबेवाले हातगाडी, रेल्वे लोकल व जवळच्या परिसरात सायकलने डबे पुरवायचे. हे डबेवाले ठरलेल्या वेळेत सर्व ठिकाणी डबे पोहचवण्याचे काम करीत आले आहेत. त्यामुळेच त्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. डबेवाल्याचे मॅनेजमेंट हा विषयही देशी-विदेशी पातळीवर अभ्यासाचा व व्यवस्थापनशास्त्राचा भाग म्हणून पुढे आला. पुढे याच डबेवाल्यांना लंडनमधून बोलावणे आले व त्यांनी तेथे हजेरी लावली. आता हेच डबेवाले आणखी कात टाकत आहेत. आधुनिक काळात तेही प्रगत होत असून वेगवान सेवेसाठी पुढे सरसावले आहेत. प्ररप्रांतीय लोकांनी या व्यवसायात प्रवेश केल्याने मराठी बांधवांचा हा धंदा अडचणीत आला आहे. त्यामुळेच लोकल, हातगाडी, सायकल ते आता मोपेडपर्यंत त्यांचा प्रवास वेगवान बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. डबेवाल्यांची गरज लक्षात घेऊन नवी मुंबईतील भैरवनाथ पतपेढीतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. टीव्हीएस कंपनीनेही त्यांच्यासाठी डबे ठेवता येईल अशी खास मोपेड उपलब्ध करून दिली आहे.
पुढे पाहा, डबेवाल्यांची क्षणचित्रे...