आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dabholkar Murder Case: Police Toucharing Sanatan Activist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोळकर हत्याप्रकरण: पोलिस सनातनच्या कार्यकर्त्यांची करतायत छळवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पोलिस राजकीय दबावाखाली असून सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांची चौकशीच्या नावाखाली छळवणूक होत आहे. पोलिसी बळाने शासन हिंदूच्या चळवळी दडपू पाहत आहे, असा आरोप सनातन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अशा पद्धतीने बोलतात की जणू त्यांनीच आरोपींना दडवून ठेवले आहे. त्यामुळे या पक्षाचीही चौकशी करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी हिंदुत्ववादी चळवळींवर संशय व्यक्त केला. त्यामुळेच पुणे पोलिसांचा तपास भरकटला आणि पोलिस ख-या मारेक-यांचा शोध घेण्यात अपयशी ठरले, असा दावा सनातन संस्थेच्या पदाधिका-यांनी केला आहे.
या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही, तरीही पोलिसांनी आतापर्यंत सनातनच्या 50 कार्यकर्त्यांची चौकशी केली आहे. काहींच्या घराची तसेच संगणकाची तपासणी केली. घरातील सर्वांची छायाचित्रे काढली. आम्ही पोलिसांना तपासात सर्व सहकार्य करत आहोत. मात्र, चौकशीच्या नावाखाली पोलिस सनातनच्या कार्यकर्त्यांचा छळ करत आहेत. तो थांबला नाही तर आम्हाला मानवाधिकार आयोगाकडे दाद मागावी लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी दिला.


राष्‍ट्रवादीची चौकशी करा
राष्‍ट्रवादी पक्षाकडे गृहखाते आहे. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत, त्याला राष्‍ट्रवादी पक्षच जबाबदार आहे. या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण हे अशा पद्धतीने वक्तव्ये करत आहेत की जणू त्यांनीच आरोपींना दडवून ठेवले आहे. त्यामुळे या प्रकरणात राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव, अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.


कोर्टात खेचणार
सनातन विरोधी खोट्या बातम्या देणारे आयबीएन-लोकमत तसेच संस्थेची बदनामी होईल अशी वक्तव्ये करणारे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि विद्या चव्हाण यांच्यावर अबु्र नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती अभय वर्तक यांनी दिली. 50 सनातनच्या कार्यकर्त्यांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे.