आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गींची हत्‍या एकाच पिस्‍तुलाने, स्कॉटलंड लॅबचा अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांचीही हत्‍या एकाच गावठी पिस्‍तुल्‍याने झाली असल्‍याची माहिती स्कॉटलंड लॅबने दिलेल्या अहवालातून समोर आली. यापूर्वी मुंबई फॉरेन्सिक लॅबने तिघांच्या हत्या एकचा पिस्तुलातून झाल्याचा अहवाल दिला होता.

काय आहे स्कॉटलंड लॅबच्‍या अहवालात
> या तिघ्‍यांच्‍या हत्‍येतील सार्ध्‍यम्‍य शोधण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयाच्‍या परवानगीने सीआयडीने लंडन येथील स्कॉटलंड लॅबमध्ये काही नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
> त्यानुसार एकाच पिस्तुलातून तिघांवर गोळ्या झाडल्याचा अहवाल स्कॉटलंड लॅबने दिला आहे.
> यापूर्वी मुंबई फॉरेन्सिक लॅबने तिघांच्या हत्या एकचा पिस्तुलातून झाल्याचा अहवाल दिला होता.
> या शिवाय सीआयडीने पानसरे हत्येमध्ये दोन पिस्तुल वापरल्याचा अहवाल दिला होता.
> त्यापैकी एक पिस्तुल इतर दोघांच्या हत्येसाठी वापरल्याचेही सीआयडीने म्हटले होते.
> त्यामुळे उच्‍च न्‍यायालयाच्या परवानगीने स्कॉटलंड लॅबमध्ये तपासणी करण्यात आली.
> या तीनही गुन्‍ह्यासाठी आरोपींनी 7.65 एमएमचे गावठी पिस्‍तुल वापरले.
> बुलेट आणि काडतुसाच्‍या फॉरेन्सिक विश्लेषणातून हे निश्चित होते, असे या अवहलात म्‍हटले आहे.
मारेकरी एकच
डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी, 20 फेब्रुवारी 2015 रोजी तर डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची 30 ऑगस्‍ट 2015 रोजी हत्‍या झाली. या तिघांचीही हत्‍या एकाच पद्धतीने झाली. शिवाय हे तिघेही पुरोगामी चळवळीत कार्य करत होते. त्‍यामुळे कर्मठ विचारधारेसाठी कार्य करणाऱ्या मारेकऱ्यांची त्‍यांची हत्‍या केली, या पुष्‍ठी मिळते. शिवाय या मागचा मुख्‍यसूत्रधारही एकच असावा हे सिद्ध होते. त्‍याच दिशेने पोलिस तपास करत आहेत.
सनातनच्‍या साधकांना अटक
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) जून महिन्‍यात ‘सनातन’चा साधक आणि हिंदू जनजागृतीशी संबंधित संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. त्‍यापूर्वी सारंग अकोलकर अटक केली होती. अकोलकर आणि तावडे हे ई-मेलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. या शिवाय कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचाच साधक समीर गायकवाड याला गत वर्षी अटक झाली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कॉम्रेट गोविंद पानसरेंच्‍या खून खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने त्‍या दिवशीचा थरार पोलिसांना सांगितला. तो त्‍याच्‍याच शब्‍दांत खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
बातम्या आणखी आहेत...