आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारेकरी शोधले नाही तर कुप्रथेवर कोण बोलणार? हायकोर्टाचे ताशेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांकडे फक्त कायदा सुव्यस्थेचा प्रश्न म्हणून पाहू नका. अशा प्रकारामुळे भविष्यात अंधश्रद्धा आणि समाजातील कुप्रथेविरुद्ध बोलण्यासाठी लोक पुढे येणार नाहीत,’ असे परखड मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी याबाबत तपास यंत्रणांनी सादर केलेल्या अहवालावर नाराजी व्यक्त केली. या दोन्ही प्रकरणात तपासाला वेग देऊन त्याबाबतचा अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

गेल्या आठवड्यात या दोन्ही प्रकरणांच्या झालेल्या वेगवेगळ्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना आतापर्यंतच्या तपासाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या दोन्ही प्रकरणांत साधर्म असल्याने न्या. आर. व्ही. मोरे आणि न्या. आर. जी. केतकर यांच्यासमोर बुधवारी दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी झाडली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने तपास यंत्रणांना खडे बोल सुनावले. तसेच तपासात मनुष्यबळ कमी असेल तर ते त्वरित उपलब्ध करून देण्याचेही निर्देशही न्यायालयाने संबंधितांना दिले आहेत.
‘एकाच यंत्रणेमार्फत तपास करता येईल’
सध्या दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय करत असून पानसरेंबाबतचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकामार्फत हाेत अाहे. मात्र, या दोन्ही प्रकरणांमध्ये विलक्षण साधर्म्य असून त्यांचा वेगवेगळा तपास करण्याऐवजी एकाच यंत्रणेमार्फत एकत्रित तपास करण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला. यावर याचिकाकर्त्याचे वकील अॅड. अभय नेवगी म्हणाले की, ‘या दोन्ही व्यक्ती सामाजिक कार्यकर्त्या जरी असल्या तरी दोघेही वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करत होते. त्यामुळे कदाचित दोघांच्याही हत्येमागचा हेतू वेगळा असू शकेल.’
तज्ज्ञांची मदत घ्या
सायबर गुन्ह्यांमधील तज्ज्ञ असलेल्या सतीश देवरे या पोलिस अधिकाऱ्याची सीबीआयला मदत करण्यासाठी त्वरित नागपूरहून पुण्याला बदली करा, असेही आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
पुढील स्‍लाइडवर वाचा वीस कोटी फोन कॉल्स तपासले : गृह राज्यमंत्री