आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dabholkar, Pansare Now Jitendra Awhad, Nathuram Manch\'s Threat Letter

\'दाभोलकर, पानसरेंनंतर आता आव्हाड!\' नथुराम मंचच्या नावाने धमकीपत्र, वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक पत्र नुकतेच त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. नथुराम विचार मंचच्या नावाने आलेल्या या पत्रावर नवी मुंबईतील ऐरोलीचा शिक्का असून पाेलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

‘हे नथुरामचक्र आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे.... आता नंबर आव्हाड आपला आहे. तुमचा निकाल लवकरच लागेल. हा महाराष्ट्र नथुराम गोडसे विचारसरणीचा आहे, हे आम्हाला पटवून द्यावेच लागेल,’ असा मजकूर या धमकीपत्रात लिहिण्यात आला आहे. नौपाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. बी. पगारे यांनीही या धमकीपत्रास दुजोरा दिला. ‘या प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. आव्हाड यांना यापूर्वीही धमकीपत्रे आली होती. मात्र ही धमकी एका वेगळ्याच संघटनेमार्फत आली आहे.
महाराष्ट्रातील पुरोगामी विचार आणि पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरवण्याचे काम काही काळापासून चालले आहे. पण या प्रकारांना न घाबरता महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ सुरूच ठेवावी, असे आवाहन जितेंद्र आव्हाड आणि धनजंय मुंडे यांनी केले आहे.
पुढे वाचा जसेच्या तसे, नथुराम विचार मंचाच्या नावाने आव्हांडाना आलेले पत्र...