आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवास प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा यंदा 14 जून रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. श्रावणी मल्टिमीडियातर्फे सलग तिसर्‍या वर्षी आयोजित केल्या जाणार्‍या या सोहळ्यापूर्वी 7 जून ते 13 जून या कालावधीत चित्रपट महोत्सव भरवण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी आलेल्या चाळीस चित्रपटांपैकी ‘आयना का बायना’, ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘काकस्पर्श’, ‘मोकळा श्वास’, ‘पुणे 52’, ‘धग’, ‘येडा’ हे निवडक चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. या सर्व चित्रपटांचा प्रेक्षकांना विनामूल्य आनंद घेता येणार आहेत.

या चित्रपटांमधून 3 उत्कृष्ट चित्रपट आणि त्यातील कलाकार तंत्रज्ञांची या पुरस्कारासाठी वर्णी लागणार आहे. यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे दादासाहेब फाळके यांच्या अडीच फूट लांबीचे पूर्णाकृती शिल्प स्मृतिचिन्ह स्वरूपात दिले जाणार आहे.