आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण किशन सिकंदर यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन शुक्रवारी गौरवण्यात आले. सुवर्णकमळ आणि दहा लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


93 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते प्राण हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील सोहळ्यास उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी प्राण यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांना हा सर्वोच पुरस्कार बहाल केला.


विशेष म्हणजे आजवर कोणत्याही कलाकाराला हा पुरस्कार घरी जाऊन प्रदान करण्यात आला नव्हता. पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी प्राण यांचा मुलगा सुनील, मुलगी पिंकी यांच्यासह जवळचे नातेवाइक उपस्थित होते.


हे तर कर्तव्यच : तिवारी
प्राण यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करणे आमचे कर्तव्य होते, असे तिवारी यांनी या वेळी सांगितले. तर हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल प्राण यांनी चाहत्यांसह सर्वांचे आभार मानले. त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील आनंद व्यक्त केल्याचे तिवारी म्हणाले.