आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जून रामपालविरोधात 'डॅडी'चा निर्माता पोलिसात, 2 कोटींच्या फसवणुकीची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॅडीमधील अर्जून रामपालचा लूक.... - Divya Marathi
डॅडीमधील अर्जून रामपालचा लूक....
मुंबई- अरूण गवळीच्या जीवनावर येऊ घातलेल्या 'डॅडी' या चित्रपटाच्या निर्मात्याने या बायोपिकमधील प्रमुख हिरो अर्जून रामपालविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे डॅडी चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होत असून त्याच्या आधी दोन दिवस 2 कोटी रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार अर्जून रामपालविरोधात दिली गेली. 
 
मंदार दळवी या चित्रपटाचे निर्माते आहेत. दळवी यांनी अर्जूनच्या कुंडालिनी एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊसविरोधात बांद्रा पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान, चित्रपट रिलीज होण्याच्या आधी दोन दिवस ही तक्रार दाखल केल्याने हा प्रसिद्धीचा स्टंट तर नाही ना याची शंका उपस्थित केली जात आहे.
 
मंदार दळवी यांनी ब्रांदा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अर्जूनच्या कुंडालिनी एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊस आणि आमच्यात क्रू मेंबर निवडण्याबाबत एक करार झाला होता. मात्र, अर्जूनने जसे ठरले होते तसे क्रू मेंबर दिला नाही व वेगळाच दिला. या प्रकरणात आमची दोन कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. 
 
याविरोधात दळवींनी आयपीसी सेक्शन 406 नुसार आणि कॉपीराईट अॅक्टच्या सेक्शन 63 नुसार भरपाई मिळण्याबाबत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात जेव्हा दळवी व अर्जून यांच्याशी संपर्क साधला तेव्हा दोघांनी या प्रकरणावर बोलायला नकार दिला असे वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले. 
 
दरम्यान, चित्रपटाची चर्चा होण्यासाठी हा खाटाटोप तर नाही ना याची चर्चा रंगली आहे. कारण यापूर्वी हे अनेकदा प्रकार घडले आहेत. तसेच दळवी यांनी ही तक्रारप 22 ऑगस्टला दिली आहे. मात्र, त्याचा गाजावाजा डॅडी चित्रपट रिलीज होण्याच्या दोन-तीन दिवस झाल्याने अनेकांना हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे वाटत आहे.  
 
पुढे या संबंधित आणखी वाचा....
बातम्या आणखी आहेत...