आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेविंदांच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टाचे म्हणणे सादर करा : हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहीहंडी मनोऱ्याच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले स्पष्टीकरण सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी राज्य सरकार आणि काही मंडळांविरोधात अवमानना याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या मनाेऱ्याची उंची २० फुटांपर्यंत ठेवण्याचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. तसेच यात १८ वर्षांखालील मुलांनाही यात सहभागी होण्यासाठी बंदी घातली होती. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश रद्दबातल ठरवत ही याचिका रद्द केली.

दहीहंडीच्या स्तरांच्या उंचीसाठी सर्वोच्च न्यायालयाने काहीही मत व्यक्त केले नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. भाजप आमदार आशिष शेलार आणि इतर काही मंडळांनी दहीहंडीत मनोऱ्याचे स्तर २० फुटांपेक्षा अधिक वर नेल्याचा आरोप पाटील यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
बातम्या आणखी आहेत...