आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहीहंडीची उंची २० फूट; बालगाेविंदा नकाेच : सर्वोच्च न्यायालय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भगवान श्रीकृष्ण लोणी चोरायचा हे आम्ही ऐकले होते, पण तो अॅक्रोबॅटिक्सही (कसरती) करायचा हे कधी ऐकले नव्हते, अशी टिप्पणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडीत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गोविंदांना सहभागी होता येणार नाही आणि दहीहंडीच्या मनोऱ्याची उंची २० फुटांपेक्षा जास्त असता कामा नये, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्बंधांवर शिक्कामोर्तबही केले.
गोविंदाचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि दहीहंडीची उंची २० फूट हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आम्ही कायम ठेवत आहोत. अन्य मुद्द्यांबाबत आम्ही विस्ताराने नंतर सुनावणी घेऊ, असे न्यायमूर्ती ए.आर. दवे आणि ए.नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने म्हटले.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर स्पष्टीकरण मागणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर हा निर्णय दिला. ऑक्टोबरमध्ये याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या या दोन्ही अटी लागू करण्यास स्थगिती दिली होती.
बातम्या आणखी आहेत...