आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dahi Handi Festival: Leaves Cancelled, 30,000 Mumbai Cops On Govinda Duty

दहीहंडी : सुट्या रद्द, 30 हजार पोलिस तैनात, मंडळांवर पोलिसांची करडी नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहीहंडी उत्सवाच्या बंदोबस्तासाठी साठी 30 हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दहीहंडी महोत्सव साजरा करण्यासाठी कोर्टाने ज्या सूचना केल्या आहेत, त्याचे पालन केले जावे, असे पोलिसांनी मंडळांना सांगितले आहे. त्यानुसार 12 वर्षाखालील मुलांचा समावेश नसेल याकडेही पोलिसांची करडी नजर आहे. तसेच वाहनांच्या छतावर प्रवास करणा-यांनाही तंबी देण्यात आली आहे.

या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणा-या मोठ्या प्रमाणावरील गर्दीचा विचार करता, सर्व पोलिस कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. या महोत्वसासाठी 30 हजारावर पोलिस कर्मचा-यांबरोबरच होम गार्ड्स आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दादर, वरळी, जोगेश्वरी आणि अंधेरी अशा खास ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे याठिकाणी सर्वात जास्त गर्दी होत असते. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांशी चर्चा करून त्यांना कोर्टाच्या सूचनांबाबत माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या नियमांचा भंग होताना आढळल्यास तातडीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले.

काही मंडळे गोविंदांच्या प्रवासासाठी ट्रक आणि टेम्पोचा वापर करत असतात. त्यावेळी या वाहनांच्या छतावर बसून गोविंदा प्रवास करत असल्याचे निदर्शनास येते. त्यात त्यांच्या जीवाला धोका असतो, त्यावरही पोलिसांची करडी नजर असेल.

देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला आहे. देशभरात जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाची अराधना केली जात. विशेषतः वृंदावन आणि मथुरेत भाविकांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पारंपरिक दहीहंडी महोत्सव हेही देशातच नव्हे तर जगभरात आकर्षणाचे केंद्र असते.

प्रमुख आकर्षण
देशभरातील श्रीकृष्ण मंदिरे जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर आकर्षकपणे सजवण्यात आली आहेत. दिल्लीतील लक्ष्मी नारायण मंदिर, इस्कॉ़न मंदिर, छत्तरपूर मंदिर, श्री श्री राधा गोवींद देव मंदिर याबरोबरच मथुरा आणि वृंदावन येथील मंदिरांवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

मथुरेत भावीकांची गर्दी
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मथुरेमध्ये हजारो भावीकांनी श्रीकृष्ण दर्शनासाठी गर्दी केली आहे. आग्रा, मथुरेसह संपूर्ण ब्रज परिसरात अत्यंत उत्साहात महोत्सव साजरा केला जात. 15 ऑगस्टला जोडून सुटी मिळाल्याने भावीक सुट्यांचा आनंदही घेत आहेत. परिसरात सुमारे दोन लाखावर भावीक आले असून आणखी मोठ्या प्रमाणात भावीकांची ये-जा सुरू असल्याचे येथील अधिकार-यांनी सांगितले. यमुनेच्या काठावर गोकुळातही शनिवारीच उत्वसाला सुरुवात झाली असून तीन दिवस येथील उत्सव सुरू राहणार आहे. याठिकाणी सुमारे चार हजारावर जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.