आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dahi Handi Festival: Leaves Cancelled, 30,000 Mumbai Cops On Govinda Duty

गोविंदा आला रे.. : सुट्या रद्द, 30 हजार पोलिस तैनात, मंडळांवर राहणार करडी नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या बंदोबस्तासाठी साठी 30 हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दहीहंडी महोत्सव साजरा करण्यासाठी कोर्टाने ज्या सूचना केल्या आहेत, त्याचे पालन केले जावे, असे पोलिस मंडळांना स्पष्टपणे सांगितले आहे. त्यानुसार 12 वर्षाखालील मुलांचा समावेश नसेल याकडेही पोलिसांची करडी नजर आहे. तसेच वाहनांच्या छतावर प्रवास करणा-यांनाही तंबी देण्यात आली आहे.

या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणा-या मोठ्या प्रमाणावरील गर्दीचा विचार करता, सर्व पोलिस कर्मचा-यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. या महोत्वासाठी 30 हजारावर पोलिस कर्मचा-यांबरोबरच होम गार्ड्स आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दादर, वरळी, जोगेश्वरी आणि अंधेरी अशा खास ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे याठिकाणी सर्वात जास्त गर्दी होत असते. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांशी चर्चा करून त्यांना कोर्टाच्या सूचनांबाबत माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या नियमांचा भंग होताना आढळल्यास तातडीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले.
पुढे वाचा - वाहनांच्या टपावर बसण्यासही चाप...