आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहिहंडी : यंदाचे आकर्षण, स्टार्सची हजेरी, कोट्यवधींची बक्षिसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यामुंबईसह महाराष्ट्रातील दहिहंडी महोत्सव अवघ्या भारतात प्रसिद्ध आहे. या महोत्सवात विदेशातील नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. दहिहंडी महोत्सव आयोजित करण्यासाठी बऱ्याच दिवसांपूर्वी नियोजन केले जाते. त्यासाठी वर्गणी गोळा केली जाते. बहुदा अशा मंडळांना राजकीय व्यक्तिंचे आर्थिक पाठबळही लाभते. एकदा बजेट ठरले, की त्याप्रमाणे खर्च केला जातो. कोट्यवधी रुपयांचे बजेट असलेल्या मंडळांकडून बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सेलिब्रिटींना बोलविले जाते. आपल्या मंडळाच्या दहिहंडीला जास्तीत जास्त लोकांची गर्दी खेचण्यासाठी एकापेक्षा एक सरस मनसुबे रचले जातात. महोत्सवाची प्रसिद्धी करण्यासाठी ठिकठिकाणी भव्य फ्लेक्स उभारले जातात. त्यावर कार्यकर्त्यांच्या नावासह महोत्सवाला उपस्थित राहणाऱ्या तारे-तारकांची छायाचित्रे लावलेली जातात. या महोत्सवात राजकीय नेत्यांपेक्षा सेलिब्रिटींना बोलविण्यावर जास्त भर असतो. त्यामुळेच पार्न स्टार सनी लिऑनलाही आमंत्रित करण्याचे धारिष्ट दाखविले जाते.

दहिहंडी फोडणारी मंडळे ही वेगळी असतात. त्यांना चक्क ड्रेसकोडही असतो. प्रत्येक मंडळाची क्षमता ठरलेली असते. त्याप्रमाणे मंडळ दहिहंडीची निवड करीत असते. थरावर थर रचून दहिहंडी फोडण्याचे कसब अंगी बानवण्यासाठी कित्येक दिवस सराव केला जातो. त्याची आजमाईश दहिहंडीच्या दिवशी केली जाते.

मुंबईतील दहिहंडीची कोटीच्या कोटी उड्डाणे... वाचा पुढील स्लाईडवर...