आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी साहसी क्रीडा प्रकार, गाेविंंदा १२ वर्षांवरीलच हवे; क्रीडामंत्री तावडेंची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहीहंडीला आता साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, यात १२ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर बंदी असेल. तसेच १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या सहभागासाठी त्यांच्या पालकांची लेखी अनुमती घेणे बंधनकारक केल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
मनोऱ्यांतील लहान मुलांच्या सहभागावरून उच्च न्यायालयाने सरकारला नियमावली आखण्याचे आदेश दिले होते. यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. समितीने गोविंदा पथकांसोबत बैठकीनंतर त्यांच्या सूचनेनुसार नियमावली तयार केली.या क्रीडा प्रकाराची राज्यपातळीवरील संघटना तयार करून नियमावली तयार करावी लागेल.

खेळाडूचा विमा
मार्गदर्शक सूचनेनुसार, संघटनेने खेळाडूचा विमा काढल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. प्रत्येक संघाने खेळाडूंची स्वत:च्या जबाबदारीवर स्पर्धेत सहभागी होत असल्याबाबतची हमीपत्रे आयोजन समितीस सादर करणे बंधनकारक.