आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MNS: राज ठाकरे झुकले, दहिहंडी घेतली खाली, राम कदम म्हणाले- राज केवळ बोलबच्चन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्‍लंघन करत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल 40 फुटांवर 'कायदेभंग' नावाची दहीहंडी बांधली होती. मात्र, पोलिसांनी समज दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्‍यांनी दुपारी ही दहीहंडी 20 फुटांवर आणली. दरम्‍यान, जय जवान गोविंदा पथकाने ती फोडण्‍यासाठी नऊ थर लावले होते. दरम्यान, राम कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. राज केवळ एसीत बसून बोलतात. गुन्हे तर कार्यकर्त्यांवर दाखल होतात. कधी तरी रस्त्यावर उतरा. शेवटच्या स्तरावर चढून दाखवा, असे राम कदम म्हणाले आहेत.
काय म्हणाले भाजप आमदार राम कदम
राज ठाकरे एसीत बसून आदेश देणार. कार्यकर्त्यांना आणि लोकांना चिथावणार. उत्साहाच्या भरात कार्यकर्ते थरांवर थर चढवणार. त्यानंतर पोलिस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार. त्यांना पकडून तुरुंगात डांबणार. तेव्हा कुणीही जाणार नाहीत. अशा वेळी आईवडील वगळता कुणीही समोर येत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे केवळ आदेश देणे योग्य नाही. यासाठी रस्त्यावर उतरायला हवे.
सहा गोविंदा पथकाने लावले सात थर
> मनसेने उभारलेली ठाण्‍यातील दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 11 लाखांचे बक्षीस दिले होते.
> दुपारपर्यंत ही हंडी 40 फूट उंच होती.
> ती फोडण्‍यासाठी सहा गोविंदा पथकांनी सात थर लावले.
डोंबिवली, चेंबूरमध्‍येही नियमभंग
मनसेने चेंबूर नाक्यावर बांधलेल्‍या दहीहंडीत बालवीर गोविंदा पथकाने आठ थर रचले. हा मानवी मनोरा 20 फुटांपेक्षा अधिक झाला होता. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई होती. डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने पाच थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त उंचीवर सलामी दिली. त्‍यामुळे या पथकावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
अशी शोधली पळवाट
न्‍यायालयाने आदेशाचे पालनही होईल आणि 20 फुटांपेक्षा उंच मानवी मनोरेही रचले जातील, यासाठी अनेक गोविंदा पथकांनी पळवाट शोधली आहे. नियमाचे पालन करण्‍यासाठी 20 फूट उंचीवर असलेलीच दहीहंडी फोडायची. पण, ती फोडण्‍यापूर्वी त्‍या दहीहंडीपासून थोड्या अंतरावर क्षमतेनुसार उंचात उंच थर रचून सलामी द्यायची, अशी ती पळवाट आहे.
कारवाई तर कारवाई, पण दहिहंडीचे थरावर थर बांधू - राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला थेट आव्हान दिले आहे. आपल्या भूमिकेबाबत न्यायालयाच्या अवमानाची कारवाई झाली तर होऊ द्या, मात्र गोविंदांवर कारवाईचा प्रयत्न झाला तर हे प्रकरण भडकेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. ठाणे आणि मुंबई त मनसेच्या वतीने अनेक ठिकाणी पूर्वीप्रमाणेच उंचच उंच हंड्या बांधण्यात येतील, सोबतच सुरक्षेचीही काळजी घेतली जाईल, अशी भूमिका घेत मनसेने ‘सविनय कायदेभंगा’ची तयारी चालवली आहे.
सर्वाधिक मानवी मनोऱ्यांचा जागतिक विक्रम नावावर असलेल्या मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने दहिहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचारासाठी रिट याचिका केली होती. बुधवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर मनसेच्या वतीने राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली. कृष्णकुंज निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी न्यायालयाच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केले. दहिहंडीसंदर्भात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने दुसरी बाजू समजूनच घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वसामान्यांच्या श्रद्धेशी निगडीत असलेले असे मुद्दे न्यायालयाने राज्य सरकारवर सोडायला हवेत, असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. सरकारने याबाबत घेतलेले पळपुटे धोरण हे दहिहंडी सणाचा विचका करण्यास कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे स्‍लाइड्सव्‍दारे वाचा..
ठाण्यात बांधणार नऊ थरांची दहीहंडी- मनसे
हिंदूंच्या सणांवर लगेच निर्णय कसे होतात?
18 ऑगस्‍टला काय म्‍हणाले होते राज ठाकरे..
बातम्या आणखी आहेत...